मिलाग्रिज हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात युवा उद्योजक विशाल परब व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती
सावंतवाडी,दि.०७: वार्षिक स्नेहसंमेलन हे प्रत्येक मुलाच्या आनंदातील एक आनंदाचा क्षण असतो आणि हा आनंदाचा क्षण प्रत्येक विद्यार्थी जपून ठेवत असतो. ह्या क्षणामध्ये मुलांचा वाटा आहेच.पण विद्यार्थी वर्गाबरोबरच गुरुजनांनाही तेवढेच मोठे स्थान आहे. हा क्षण निर्माण करून देणाऱ्या गुरुजन वर्गाचे पण कौतुक केलं पाहिजे. असे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.ते मिलाग्रिज हायस्कूल येथील वार्षिक स्नेहसंमेलनात व्यासपीठावरून बोलत होते. तर आज मी जो मोठा झालो आहे त्यात माझ्या गुरुजनांचा मोठा मोलाचा वाटा आहे. मी पण एक ग्रामीण भागातील शाळेतून शिकून आलेलो विद्यार्थी आहे आज या व्यासपीठावर बसल्यानंतर खरंच आजचे विद्यार्थी कशा पद्धतीने यश संपादन करत आहेत हे बघून आनंद होत असून मलाही माझे शालेय जीवनातील दिवस आठवत आहेत.भविष्यात या हायस्कूलला काहीही कमी पडू देणार नाही.असे प्रतिपादन उद्योजक विशाल परब याने केले.मिलाग्रिज हायस्कूल च्या स्नेहसंमेलनात व्यासपीठावरून प्रमुख उपस्थिती म्हणून ते बोलत होते.
मिलाग्रिज हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त बक्षीस वितरण समारंभात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण,भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशचे उपाध्यक्ष तथा युवा उद्योजक विशाल परब,जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,राजन तेली,संजय परब,महेश सारंग आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.