‘शिवसंस्कार’ मार्फत विविध आंतरराज्यीय स्पर्धांचे आयोजन..!

0
139

सावंतवाडी,दि.०५: छत्रपती शिवाजी महाराज ही एक अनमोल विचारधारा आहे.जोपर्यंत सुर्यचंद्र आहेत तोपर्यंत ही विचारधाराच आपल्याला जगतांना उपयोगी येणार आहे.म्हणूनच शिवरायांचे हे तेजस्वी विचार जागृत ठेवण्यासाठी ‘शिवसंस्कार’ सातत्याने कार्यरत आहे.महाराजांच्या अंगी असलेल्या नियोजन,नेतृत्व,कर्तृत्व,अभ्यास,राजनिती,रयतेवरच प्रेम,दूरदृष्टी,विवेक,संयम अशा अनेक सद्गुणांचा उहापोह करत आजच्या उमलत्या पिढीला शिवसंस्कार देणे ही काळाची गरज आहे.शिवनीती हीच आजच्या युगातही यशाची गुरुकिल्ली आहे आणि हेच महत्व शिवसंस्कार च्या अनेक उपक्रमांमधून प्रत्तेक अबालवृद्धा पर्यंत पोहोचवण्याचं कार्य शिवसंस्कार करत आहे. गत वर्षाप्रमाणे चालू वर्षीही अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
*राष्ट्रमाता जिजाऊ वेशभूषा स्पर्धा*- राष्ट्रमाता जिजाऊंना जयंतीनिमित्त मानवंदना देण्यासाठी वेशभूषा स्पर्धा घेण्यात येत आहे.
शिशुगट- ३ते५ वर्षे
बालगट -६ते १० वर्षे
मोठा गट-११ते १४
खुला गट-१५पासून पुढे
*माता पालकांसाठी*
या मध्ये मातांनी आपल्या मुला किंवा मुलीसोबत जिजाऊ व शिवबा अशी वेशभूषा करून २मिनिटांचा मार्मिक आजच्या समाजाला उद्बोधक संवाद असलेला व्हिडीओ करून पाठवायचा आहे.मुल स्वतःच च असावं अशी अट नाही.माता व मुली सुद्धा जिजाऊ म्हणून भाग घेऊ शकतील.
*छत्रपती श्री शिवाजी महाराज चरित्र स्पर्धा*
यंदा आठव्या वर्षी जिल्हास्तरीय १०० मार्कंची होणारी ही परीक्षा येत्या२८ जानेवारीला रविवारी सकाळी १० ते १ या वेळेत ठरलेल्या केंद्रांवर पार पडेल. संबंधित सर्व शाळांना आवश्यक ती माहिती व सूचना शिवसंस्कार कडून देण्यात येतील.
*स्वराज्य संकल्पक शहाजीराजे*
शहाजीराजे पुण्यतिथीनिमित्त ही निबंध स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात येत आहे.
पहिला गट- १३ ते १५
खुला गट- १५ पासून पुढे
स्वच्छ अक्षरांत सुमारे २००० शब्दांत निबंध असावा.स्पर्धकाने नाव व फोन नंबर चा वेगळा कागद निबंधासोबत २२८,मातृभूमी शिक्षण संस्था,सबनीसवाडा,सावंतवाडी,सिंधुदुर्ग,महाराष्ट्र ४१६५१० या पत्त्यावर पाठवावा.
*माझा आवडता मावळा*
फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या शिवजयंती निमित्त ‘माझा आवडता मावळा’ या अंतर्गत मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा आयोजन केले आहे. आपल्याला आवडणाऱ्या कोणत्याही मावळ्यांची वेशभूषा करून दोन मिनिटांचा व्हिडिओ सादर करायचा आहे.
*छत्रपती शिवाजी महाराज*
यामध्ये महाराजांचे A3 साईज पेपरवर चित्र काढायचे आहे.चित्राच्या बाजूस स्पर्धकाने आपले नाव,वय व पत्ता लिहिणे अनिवार्य आहे.
*पहिला गट*-११ ते १४ वर्षे
*खुला गट*-१५ पासून पुढे
चित्र शिवसंस्कार ला ऑनलाइन पाठवायचे आहे. सुरू केल्यापासून पूर्ण होईपर्यंतचे १५सेकंदांचे तीन व्हिडिओ पाठवणे आवश्यक आहे.आवडीनुसार रंग वापरण्याची मुभा आहे.पेन्सिल स्केच पाठवू शकता.
वरील सर्व स्पर्धा महाराष्ट्र, गोवा,कर्नाटक,गुजरात या चारही राज्यांसाठी ऑनलाइन स्वरूपात होणार आहेत. जिल्हास्तरीय श्री शिवचरित्र स्पर्धा परीक्षा फक्त ऑफलाईन स्वरूपात घेण्यात येईल याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी शिवसंस्कारच्या 9607827296 या नंबरवर संपर्क साधावा,तसेच याच नंबरवर सर्व व्हिडिओ पाठवावे.
वरील सर्व उपक्रमामधून ‘शिवसंस्कृतीचे जतन व शिवसंस्कारांचे मंथन’ साध्य व्हावे व समाजाला शिवविचारांची जोड मिळावी म्हणून जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घ्यावा तसेच तमाम शिवप्रेमींनी शिवसंस्कार समूहाला हातभार लावावा असे विनम्र आवाहन शिवसंस्कार च्या वतीने करण्यात आले आहे.
सर्व व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख ३० जानेवारी २०२४ राहील.सर्व स्पर्धांचा निकाल तिथीने येणाऱ्या शिवजयंतीला जाहीर केला जाईल. विजेत्या सर्व स्पर्धकांना या वर्षी होणाऱ्या वार्षिक सन्मान सोहळ्यात विशेष अतिथींच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here