तालुकाप्रमुख रुपेश राऊळ आणि मायकल डिसोजा यांनी उमेदवारांना भेट देऊन दिला विजयाचा कानमंत्र
सावंतवाडी,दि.१५ : तालुक्यातील शिरशिंगे येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सरपंच पदाचे उमेदवार सुरेश शिर्के आणि सदस्यपदाच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून सुरेश शिर्के यांच्यासह त्यांच्या पॅनलला मतदारांचा खंबीर पाठिंबा मिळत आहे. घरोघरी विकासाचे व्हिजन घेऊन त्यांनी प्रचारावर जोरदार भर दिला आहे.
प्रभाग क्रमांक तीन मधील सरपंच पदासाठी उमेदवार असलेल्या श्री शिर्के यांनी बोलतांना सांगितले की या निवडणुकीत आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावर आणि आपल्या सोबत असलेली युवा पिढी आणि गावातील जाणती राजकीय मंडळी यांच्या साथीने आपण विजय संपादन करून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.
दरम्यान काल बुधवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ आणि तालुका संघटक मायकल डिसोजा, मा.जि. प. सदस्य राजन मुळीक यांनी या मतदार संघात भेट देऊन आपल्या उमेदवारांना विजयाचे कानमंत्र दिले.
यावेळी सरपंच पदाचे उमेदवार श्री सुरेश शिर्के, प्रचार प्रमुख रामचंद्र भिंगारे, सदस्य पदाचे उमेदवार आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान कपबशी ही निशाणी मतदारांपर्यंत वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून आपण पोचवली आहे, आणि आपल्याच पॅनलचा विजय निश्चित आहे.असा विश्वास सरपंच पदाचे उमेदवार श्री सुरेश शिर्के यांनी व्यक्त केला.