कोलगाव भोमवाडी जिल्हा परिषद शाळेत डिजिटल कृतीयुक्त शिक्षण

0
87

व्हाट्सअप ग्रुप वर दिले जातात इंटरऍक्टिव्ह कंटेंट… उपक्रमाचे कौतुक

सावंतवाडी,दि .२५ नोव्हेंबर: तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कोलगाव भोमवाडी या शाळेने शाळेचा व्हाट्सअप ग्रुप तयार करून व त्या ग्रुप वर इंटरऍक्टिव्ह कन्टेन्ट पाठवून विद्यार्थ्यांना घरबसल्या डिजिटल कृतीयुक्त शिक्षण दिले आहे. शाळेतील उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक सुनील करडे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम निश्चितच डिजिटल कृतीयुक्त शिक्षण घेण्यास उपयुक्त आहे.

या उपक्रमांतर्गत इंटरऍक्टिव्ह व्हिडिओ, फिल इन द ब्लँक, ट्रेस द वर्ड, इत्यादी सारखे विविध प्रकारचे इंटर ऍक्टिव्ह कंटेंट तयार करण्यात आले आहेत.
हे कंटेंट जिल्ह्यातील तसेच राज्यातील अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते शिक्षकांच्या राज्यस्तरीय व्हाट्सअप ग्रुप वर पोस्ट केले जात आहेत.
या उपक्रमासाठी केंद्रप्रमुख म. ल.देसाई, गटशिक्षणाधिकारी बोडके मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंकिता कुंभार, गावचे सरपंच संतोष राऊळ, तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक यांचे सहकार्य लाभल्याने हा उपक्रम शंभर टक्के यशस्वी ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here