सौ.घारे यांचे कार्य प्रेरणादायी..माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांची सावंतवाडीत पत्रकार परिषद..
सावंतवाडी,दि.३०: येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभागीय अध्यक्षा अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब यांचा वाढदिवस उद्या १डिसेंबर रोजी सेवा-भावी कार्यक्रमाने साजरा होणार आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे नेते व माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
वाढदिवसानिमित्त अर्चना फाऊंडेशनच्या वतीने सावंतवाडी येथील नारायण मंदीरात भव्य पुस्तक प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी श्री.भोसले यांनी अर्चना घारे परब यांच्या कार्याची स्तुति केली.
अर्चना घारे गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी गोरगरीब जनतेसाठी काम करून त्यांना न्याय देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांचा हा वाढदिवस सेवाभावी कार्यक्रमाने साजरा होणार आहे. असे ही श्री. भोसले म्हणाले.
यावेळी महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी, नयहिम मेमन, संदीप परब, वैभव परब आदी उपस्थित होते.