सावंतवाडी, दि.१० : कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले ,या थोर महापुरुषांबद्दल चंद्रकांत पाटलांनी केलेल्या बेताल वक्तव्या बाबत आज सावंतवाडी येथे बौद्ध समाज आरपीआय व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी यांच्या वतीने लोकशाही पद्धतीने शांततेत प्राथमिक स्वरूपात निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, बौद्ध समाज आरपीआय कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.