शरद मोचेमाडकर यांच्या पौराणिक नाटकाचा पुण्यात प्रयोग..

0
66

सिंधुदुर्ग युवा ग्रुपचे आयोजन, अर्चना घारे – परब यांच्या हस्ते उदघाटन

सिंधुदुर्ग,दि.२५: शरद मोचेमाडकर प्रस्तुत जय हनुमान पारंपरिक नाट्यमंडळ दांडेली आरोस सिंधुदुर्ग, यांच्या “टपकेश्वर तीर्थक्षेत्र” या पौराणिक नाट्य प्रयोगाचे आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी, पुणे येथे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या
कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे-परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या नाट्य प्रयोगाचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाला सिंधुदुर्ग उत्कर्ष मंडळ अध्यक्ष अजय पाताडे, माजी सभापती दया धाऊसकर, उद्योजक विलास गवस, सुनील पालकर, विजय परब आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना अर्चना घारे यांनी सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या. दशावतार कला ही कोकणी माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शेकडो किलोमीटर दूर आपले घर, गाव सोडून राहत असताना देखील कोकणातील परंपरा, सांस्कृती जपण्याचा, टिकवण्याचा प्रयत्न करत असल्या बद्दल सिंधुदुर्ग युवा ग्रुप चे त्यांनी कौतुक केले. तसेच या नाटकाच्या आयोजनातून कोकणी कलाकारांना भव्य व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल सिंधुदुर्ग युवा ग्रुप, पुणे व प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले.

या वेळी निवृत्त सैनिक, खेळाडू व कलाकार यांना सन्मानित करण्यात आले. या नाट्य प्रयोगास पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांचा, विशेषतः कोकणी नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर गावडे, गजानन परब, अमित वारंग, अनिल माळकर, सचिन बांदेकर व सिंधुदुर्ग युवा ग्रुपच्या सर्व पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here