आंबोली रस्ता आहे की… मृत्यूचा सापळा या रस्त्याची जबाबदारी कोणाची…?

0
55

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा प्रशासनाला सवाल…

सावंतवाडी, दि.२४ : तालुक्यातील आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाचे माहेरघर म्हणून प्रत्येक राजकीय पुढारी म्हणत आलेले आहेत खरंच सांगायचं झालं तर आंबोली आंबोली दक्षिण कोकणातील थंड हवेचे ठिकाण हे इंग्रजांच्या काळापासून संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे आज इथल्या पर्यटनाला पूरक रस्ते चांगले नसल्यामुळे फटका बसत आहे तसेच अनेक वाहनांचे अपघात होऊन नुकसान होत आहे.

आतापर्यंत बरीच वाहने अपघात ग्रस्त होऊन अनेक लोक जखमी झाले आहेत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षपणामुळे या भागातील रस्ता संपूर्ण उकडला गेला असून खराब झालेला आहे याचा फटका स्थानिक आंबोली वासी, व्यापारी, हॉटेल व्यवसायिक यांना बसत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने ज्या ठेकेदाराला हा रस्ता करण्यासाठी दिला होता त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी साळगावकर यांनी संबंधित विभागाकडे केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here