दोडामार्ग,दि.२५ : कोनाळ लोंढे वाडी येथे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री खंडेराय भवानी मंदिरात दांडीया, फुगडी, लहान मुलांचे डान्स, चपय नृत्य,भजन अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. याशिवाय जादूगार वैभवकुमार यांच्या कार्यक्रमाने धमाल उडवून दिली.
नवरात्र उत्सवात श्री देवी खंडेराय भवानी चा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जागर करण्यात आला. दसरा उत्सवाच्या निमित्ताने सोनं लुटण्याचा कार्यक्रमही उत्साहात साजरा करण्यात आला.
जादूगार वैभवकुमार यांचा प्रयोग झाला. यावेळी कलाकार रामदास पारकर आणि जादूगार वैभवकुमार यांनी सर्वांना खिळवून ठेवले. जादूच्या प्रयोगातून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत धमाल उडवून दिली. रामदास पारकर यांनी आपल्या आवाजाचे सादरीकरण केले.
कथ्थक नृत्यात प्रथम परिक्षा उत्तीर्ण व शालेय कॅरम स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या आस्था अभिमन्यू लोंढे हीचा शाल व श्रीफळ देऊन कलाकार रामदास पारकर व जादूगार वैभवकुमार यांनी सत्कार केला.
यावेळी लहान मुलांनी रेकॉर्ड डान्स केले. तसेच लहान व मोठ्या गटात रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ते बक्षीस वितरण करताना महिला बचत गटांचा समावेश महत्त्वाचा ठरला.