सिंधुदुर्ग,दि.१८: उत्तर प्रदेश मध्ये होत असलेल्या ऑल इंडिया कुराश स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरा खेळाडूंची निवड झाली आहे. हे खेळाडू उत्तर प्रदेश साठी रवाना झाले आहेत .स्पर्धा २० ऑक्टोबरला होणार आहे .इंदापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत या खेळाडूंनी तेरा सुवर्णपदक मिळविली.त्यामुळे या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
निवड झालेल्या खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे- प्रथमेश अमित तळवणेकर राणी पार्वती देवी हायस्कूल,प्रथमेश मारुती राठोड कोलगाव आयटीआय सोहम कृष्णा कारेकर, मिलाग्रिस हायस्कूल, लोचन अशोक पेडणेकर, श्रीगणेश संपत चव्हाण, समर्थ दयानंद लाडेगावकर, अथर्व रवींद्र फडतरे, अनुराग अमोल बागडी एस अनंता धुरी, वेदांत आत्माराम परब सर्व सैनिक स्कूल आंबोली , दिनेश सुरेश देवकुळे स्वप्निल अर्जुनगराय रेग श्रेयस नागेश बोकाडे डायनॅमिक पब्लिक स्कूल आंबोली तर राष्ट्रीय पंच म्हणून दिनेश जाधव महाराष्ट्राचे टीम मॅनेजर म्हणून शिवम म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा जुडो कराटे असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष वसंत जाधव या प्रशिक्षक दिनेश जाधव यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.