सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघाचे अध्यक्षपदी शाम कुंभार

0
64

म्हाडा च्या निर्देशानुसार पडताळणी यादी जलदगतीने भरून द्यावी आवाहन

सावंतवाडी,दि.१७: सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघाच्या अध्यक्षपदी शाम कुंभार यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी गिरणी कामगार व वारसदार यांना घराची लाॅटरी काढण्यासाठी म्हाडा ने पडताळणी यादी ऑनलाईन पद्धतीने भरून देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. गिरणी कामगारांची यादी जाहीर केली आहे. त्यांनी पडताळणी यादी जलदगतीने भरून द्यावी असे आवाहन केले.
श्रीधर अपार्टमेंट या शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्या कार्यालयात गिरणी कामगार व वारसदार यांची बैठक झाली. संघटनेचे अध्यक्ष कै.दिनकर मसगे यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांनंतर संघटनेची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघाचे अध्यक्ष म्हणून शाम कुंभार, सचिव लाॅरेन्स डिसोजा, उपाध्यक्ष रामचंद्र कोठावळे, अभिमन्यू लोंढे, विश्वनाथ कुबल, दिलीप सावंत, सह सचिव राजन पडते, खजिनदार घनश्याम शेटकर यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून सुभाष परब,रेखा लोंढे, सुरेखा भिसे, मदन नारोजी, संजय कदम, सुमन मुळीक, सुरेश आसोलकर आदींची निवड करण्यात आली.
यावेळी शाम कुंभार म्हणाले, गिरणी कामगार व वारसदार यांनी म्हाडा च्या निर्देशानुसार पडताळणी यादी जलदगतीने भरून द्यावी. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर आहे. मंत्रीमहोदय दिपकभाई केसरकर यांच्या कार्यालयातून त्यासाठी सहकार्य करण्यात आले आहे तसेच मोबाईल, संगणक आणि खाजगी संगणक चालकांकडून ऑनलाईन पद्धतीने पडताळणी यादी जलदगतीने भरून द्यावी. तसेच राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, अण्णा शिर्सेकर व अन्य मान्यवरांनी सहकार्य देण्याचे मान्य केले आहे.
यावेळी सुर्यकांत नाईक, गणपत गावडे, विष्णू परब,मोहन सावंत, राजश्री गवस,सौ रविना नाईक, गजानन लोंढे, विजय राणे, संगिता करंगुटकर, दाजी खानोलकर, हेमंत देसाई, प्रिया मोरजकर सह सुमारे ११५ कामगार व वारसदार उपस्थित होते.
म्हाडा च्या निर्देशानुसार यापुर्वीच फाॅर्म कै. दिनकर मसगे यांच्या मार्गदर्शनाखाली भरून दिले होते. त्या पावत्या मसगे यांच्या कुटुंबीयांनी दिल्या आहेत. त्या आपल्याकडे आहेत असे श्री कुंभार यांनी सांगितले. यावेळी लाॅरेन्स डिसोजा, अभिमन्यू लोंढे, रामचंद्र कोठावळे, राजन पडते, विश्वनाथ कुबल आदींनी शंकांचे निरसन केले. गिरणी कामगार व वारसदार यांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here