…येत्या २५ ऑक्टोंबर पर्यंत सेवा सुरळीत न झाल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
सावंतवाडी,दि.१७: तालुक्यातील शिरशिंगे गावातील बी.एस.एन.एल (BSNL) ची सुविधा लाईट गेल्यावर बंद होते, या संदर्भात आज येथील ग्रामस्थांनी जिल्हा प्रबंधक जुन्नू यांची भेट घेत त्यांना धारेवर धरले.

टॉवर ला बॅटरी बॅकअप नसल्याने लाईट गेल्यावर नेटवर्क जातं यासाठी येत्या आठ दिवसात बॅटरी दुरुस्ती करा आणि तांत्रिक अडचणी असतील तर त्या लवकर सोडवा अन्यथा येत्या २५ तारीख ला सकाळी १० वाजता लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल अशा प्रकरचा इशारा यावेळी देण्यात आला.
दरम्यान जिल्हा प्रबंधक यांनी येत्या १५ दिवसात सेवा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी सभापती रवींद्र मडगावकर, माजी जि.प.सदस्य पंढरी राऊळ,शिरशिंगे सरपंच दीपक राऊळ,सांगेली सरपंच लवू भिंगारे उपसरपंच सचिन धोंड,नारायण राऊळ,गणपत राणे,पांडुरंग राऊळ, गणू राऊळ,प्रशांत देसाई, राजेंद्र सावरवाडकर,अंकुश परब, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.



