सावंतवाडी,दि.०५: येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सावंतवाडी शहर अल्पसंख्याक शहराध्यक्ष पदी जहुर खान यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी उपाध्यक्षपदी शौकत बेग, सरचिटणीस पदी इलियास आगा, तर चिटणीस पदी शादाब शेख, मोहसीन करोल,आसिफ खान, मल्लिका जान नदाफ, यांची नियुक्ती करण्यात आली.
तर सदस्य म्हणून फिरोज खान, रजब खान, आसिफ मेमन, इरफान शेख, रिजवान शेख, अनिस शेख यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,काशीनाथ दुभाषी, सायली दुभाषी, आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.