मराठा बांधवांचे जे नाहक रक्त पोलीस प्रशासनाने सांडवले आहे त्याचा हिशोब सरकारला द्यावाच लागेल..

0
89

मराठा समाज तालुकाध्यक्ष सिताराम गावडे आक्रमक.. नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांना निवेदन

सावंतवाडी दि.०५: मराठा बांधवांचे जे नाहक रक्त पोलीस प्रशासनाने सांडवले आहे त्याचा हिशोब सरकारला द्यावाच लागेल हे सांडलेले रक्त मराठा समाज कधीच विसरणार नाही या रक्ताची जबर किंमत शासनाला मोजावी लागेल असा इशारा मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सिताराम गावडे यांनी सावंतवाडी तहसीलदार यांना समाजाच्या वतीने निवेदन देताना शासनाला दिला आहे.
दरम्यान आता मराठा बांधव हा गप्प बसणार नाही तर अजून पेटून उठणार असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी सल्लागार विकास सावंत यांनी आता मराठा समाजाला कोणत्याही राजकीय पक्षावर विश्वास राहिलेला नाही,
पक्षाने फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा समाजाचा उपयोग करून घेतला त्यामुळे आता ही लढाई प्रत्येक मराठ्यांनी स्वतःची वैयक्तिक लढाई आहे असे समजून लढली पाहिजे तरच आपण विजय संपादन करू शकतो असे सांगून जालन्यामध्ये झालेल्या लाठी चार्ज हा सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप केला..

आज सावंतवाडी मराठा समाजाच्या वतीने येथील नायब तहसीलदार संदीप सावंत यांना निवेदन सादर केले. दरम्यान यावेळी जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या
यावेळी विकास सावंत, लक्ष्मण नाईक,अर्चना घारे परब, बाळा गावडे, बाबू कुडतरकर सुधीर राऊळ, अपर्णा कोठावळे, प्रशांत कोठावळे, पुढलिंक दळवी, जिवन लाड, सचिन बिरोडकर, एकनाथ गावडे,विनिश तावडे,गोविंद सावंत,आनंद सावंत,अब्जू सावंत,राजन,सावंत,तानाजी पाटील,विलास जाधव,संदिप गवस, शिवदत्त घोगळे, चंद्रकांत राणे,राजू तावडे,उमाकांत वारंग,विकास सावंत, लक्ष्मण नाईक,बाळा गावडे, बाबू कुडतरकर सुधीर राऊळ, तानाजी पाटील,विलास जाधव,संदिप गवस, शिवदत्त घोगळे, चंद्रकांत राणे,राजू तावडे,सुधीर राऊळ,उमाकांत वारंग आदी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here