मंत्री दिपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून मतदार संघासाठी १५ कोटी रुपये निधी मंजूर..

0
106

शिवसेना (शिंदेगट) जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांची माहिती

सावंतवाडी,दि.०२: सावंतवाडी – वेंगुर्ला- दोडामार्ग विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांना निधी मिळावा यासाठी शासन स्तरावर लेखी मागणी केल्यानुसार मतदार संघासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत शिक्षण मंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्या शिफारसीनुसार सन २०२३-२४ या वर्षासाठी सावंतवाडी नगरपरिषद, वेंगुर्ला नगरपरिषद, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग. ग्रामीण भागातील गांवे अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार ग्रामीण भागातील विविध विकास कामांना सुमारे ५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.

तसेच सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील तरतुदीनुसार शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर यांनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे (लेखाशीर्ष २०१५-१२३८) या योजने अंतर्गत सावंतवाडी मतदार संघातील सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यासाठी सुमारे १० कोटी रुपये विविध विकास कामांना निधी मंजूर केला आहे. लवकरात लवकर सदर विकास कामांना सुरुवात होणार आहे. रुपये १५ कोटी निधी विकास कामांना मंजूर केल्याबाबत शहरी व ग्रामीण भागांतील जनतेने शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे अभिनंदन केले आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदेगट), जि. सिंधुदुर्ग अशोक दळवी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here