रुग्णालयात आरोग्य सेवांच्या बाबतीत जनतेला भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत मनसेने वेधले लक्ष
सिंधुदुर्ग,दि.२६: जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नूतन अधिष्ठाता श्रीम सुनीता रामानंदा यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर व पदाधिकाऱ्यांनी भेट घेत रुग्णालयात जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधून सकारात्मक चर्चा केली. बाह्य यंत्रणेद्वारे कर्मचारी नियुक्त करतात स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात यावे, संध्याकाळच्या वेळेस बाह्य रुग्ण सेवा चालू करण्यात यावी, स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या सेवांचे वेळापत्रक प्रसिद्धी करावी, महिन्यातून एक दिवस विद्यार्थ्यांचे समुपदेशन वर्ग घेण्यात यावेत,खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणून स्थानिक पुरवठादारांना प्राधान्य देण्यात यावे अशा सूचना मनसे पदाधिकाऱ्यांना दिल्या.कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे अनेक अडचणी भासत असून त्यातून मार्ग काढत काढत रुग्णालयाचा कारभार अधिक पारदर्शक व लोकोपयोगी करण्याचा शब्द अधिष्ठाता श्रीम सुनीता रामानंदा यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी कुडाळ माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,विनोद सांडव,बाबल गावडे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, रस्ते आस्थापना जिल्हा संघटक अमोल जंगले, राजेश टंगसाळी, वैभव धुरी, संतोष सावंत व प्रशासकीय अधिकारी श्री नवले उपस्थित होते.