सावंतवाडी,दि.२३: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाका तिथे शाखा उपक्रमाअंतर्गत झाराप झिरो पॉईंट फ्रेंड्स कट्टा येथे मनसेची नवीन शाखा सुरु करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून नाका तिथे मनसेची शाखा उघडण्याचे आदेश देण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर झाराप झिरो पॉईंट येथे मनसेची नवीन शाखा स्थापन करण्यात आली. यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक, नंदू परब,निलेश देसाई,पिंट्या नाईक, ज्ञानेश्वर नाईक, संदेश सावंत, स्वप्निल जाधव, विजय जांभळे, अभि पेडणेकर, कौस्तुभ तेली, सागर येडगे आदि उपस्थित होते.
भविष्यात ग्रामस्थांना कोणत्याही समस्या असल्यास त्यांना शाखेतील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन पदाधिकारी मंदार नाईक यांनी केले आहे. सध्या मनसे तर्फे नाका तिथे मनसेची शाखा हा उपक्रम राज्यभरात जोरात सुरु आहे. या उपक्रमाला पक्षातील पदाधिकारी यांच्याकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार स्वप्निल जाधव,विजय जांभळे यांनी या उपक्रमाला पहिला प्रतीसाद देत येथील स्थानिक पदाधिकारी यांना सोबत घेऊन झाराप झिरो पॉईंट फ्रेंड्स कट्टा येथे पहिली नवीन शाखा सुरु केली.
तसेच नाका तिथे मनसेची शाखा ही संकल्पना विविध ठिकाणी जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी सांगितले.
Home ठळक घडामोडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाका तिथे शाखा उपक्रमाअंतर्गत झाराप झिरो पॉईंट येथे नवीन...