राष्ट्रवादीचे पुंडलिक दळवी व मनसेचे अनिल केसरकर यांचा योग्य पाठपुरावा..
सावंतवाडी,दि.२३: आज सकाळपासून सावंतवाडी नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांचे नगरपरिषदे समोर सुरू असलेले आंदोलन सायंकाळी उशिरा मागे घेण्यात आले. कंत्राटी सफाई कामगारांचा मागील दोन महिन्याचा पगार झाला नसल्याने हे आंदोलन करण्यात आले होते सावंतवाडी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाशी व मुख्याधिकाऱ्यांशी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी व मनसेचे ॲड .अनिल केसरकर यांनी वारंवार संपर्क साधून तसेच संबंधित ठेकेदाराशी रीतसर पाठपुरावा करीत या कंत्राटी कामगारांचे दोन महिन्याचे थकीत वेतन यशस्वीरीत्या मिळवून दिले. सायंकाळी उशिरा कंत्राटी कामगारांच्या खात्यावर त्यांचे वेतन जमा झाले त्यामुळे रोजच्या मजुरीवर काम करणाऱ्या त्या सफाई कामगारांनी राष्ट्रवादीचे पुंडलिक दळवी मनसेचे अनिल केसरकर, ठाकरे शिवसेनेचे शब्बीर मणियार, भाजपचे पदाधिकरी, शिंदे शिवसेनेच्या अनारोजीन लोबो, नगर परिषदेचे मुख्याधिकारी साळुंखे, आरोग्य अधिकारी सौ. नाडकर्णी श्री म्हापसेकर यांचे विशेष आभार मानले.