बीएसएनएल कंत्राटी कामगार गेल्या अडीच वर्षापासून पगाराच्या प्रतीक्षेत..

0
115

सावंतवाडी मनसे शिष्टमंडळाने विचारला अधिकाऱ्यांना जाब..

सावंतवाडी, दि.२४ : येथील बीएसएनएल कार्यालयात कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून वेतन मिळाले नसल्याने या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसमोर उपासमारीची वेळ आली आहे.

कंत्राटदारांच्या मुजोरी कारभाराला कंटाळून यासंदर्भात त्यांनी आपल्या व्यथा मनसे पदाधिकाऱ्यांजवळ मांडल्या आणि त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी बीएसएनएलचे प्रबंधक यांची भेट घेतली. मात्र त्यांनी आपण कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात मध्यस्थी केली आहे. मात्र तो प्रश्न सुटू शकला नाही, याला कारणीभूत संबंधित ठेकेदार आहेत, असे सांगितले. अशावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारांना संपर्क केले असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देत आहेत.

येत्या ३० नोव्हेंबर रोजी राज ठाकरे यांचा दौरा असल्यामुळे हा सर्व प्रश्न ते सोडवतील, असा आशावाद मनसेचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर, सचिव कौस्तुभ नाईक, उपशहर अध्यक्ष प्रवीण गवस, लॉटरी सेना तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर, तिरोडा शाखाप्रमुख मनोज कांबळी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here