पत्रकारांच्या मदतीसाठी धावून येणार्‍या संस्थांचे कायम ॠणी राहू..अभिमन्यू लोंढे

0
73

नॅब असोशिएशन व रोटरीच्या माध्यमातून सावंतवाडीत चष्मा वाटप

सावंतवाडी,दि.०९: पत्रकार सर्वाच्या मदतीला जातात अनेकांना सहकार्य करतात परंतू त्यांच्या मदतीला कोणीही धावून येत नाही रोटरी क्लब व नॅबच्या माध्यमातून चष्मे देण्यासाठी राबविण्यात आलेला उपक्रम कौतूकास्पद आहे आम्ही पत्रकार त्यांचे कायमचे ऋणी राहू असे मत जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांनी आज येथे मांडले.
सावंतवाडी पत्रकार संघ रोटरी क्लब सावंतवाडी आणि नॅब असोशिएशन सावंतवाडी यांच्या संयुक्त विदयमाने सावंतवाडीतील पत्रकारांना आज चष्म्याचे वाटप करण्यात आले या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी नॅबचे अध्यक्ष अनंत उचगावकर,रोटरीचे अध्यक्ष मावळत्या अध्यक्षा सुहास सातोसकर,मावळत्या अध्यक्षा सौ विनया बाड,जेष्ठ पत्रकार अण्णा केसरकर,डीजीटल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर,जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार संतोष सावंत,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश्चद्र पवार,सचिव मयुर चराठकर, रामचंद्र कुडाळकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री लोंढे पुढे म्हणाले या ठीकाणी पत्रकारांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता याला चांगला प्रतिसाद लाभला एखादी सामाजिक संघटना पत्रकाराच्या मदतीसाठी येते हे कौतूकास्पद आहे असेच सहकार्य पुढे करण्यात यावे असे ते म्हणाले
यावेळी डॉ बाड म्हणाल्या सामाजिक काम करीत असताना काम आम्ही काही तरी पत्रकारांचे देणे लागतो या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला होता कार्यकाळ संपताना असा उपक्रम राबविला याचा मला अभिमान आहे.
ङी सातोसकर म्हणाले या ठीकाणी रोटरीच्या माध्यमातून भविष्यात खास पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्याचा आमचा मानस आहे लवकरच हा कार्यक्रम घेण्यात येईल त्यासाठी आवश्यक असलेले सहकार्य आम्ही नक्कीच करू
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पवार यांनी केले तर आभार कुडाळकर यांनी मानले यावेळी उपस्थित पत्रकारांना चष्म्याचे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here