आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार
सावंतवाडी,दि.०१: सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या वार्षिक गुणवंतांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात श्री संत रोहिदास सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक सदानंद चव्हाण यांना संत रोहिदास समाज भूषण पुरस्कार कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. चर्मकार समाजाच्या प्रती केलेल्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या वतीने झालेल्या सिंधुदुर्ग नगरी येथील सोहळ्यात त्यांनी समाजाप्रती केलेल्या कामाबरोबर सहकार आणि बँकिंग क्षेत्रात भरीव काम केले आहे याबद्दल आमदार नाईक यांनी त्यांचे कौतुक केले चर्मकार समाज उन्नती मंडळाचे ते सावंतवाडी तालुका समितीचे फाउंडर मेंबर आहेत. सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड या गावचे ते सुपुत्र असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी गटविकास अधिकारी विजय चव्हाण सावंतवाडी उन्नती मंडळाचे सचिव गुंडू चव्हाण सावंतवाडी तालुका माजी अध्यक्ष विजय चव्हाण श्री संत रोहिदास सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष बाबुराव चव्हाण तसेच चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव व पदाधिकारी उपस्थित होते.