सावंतवाडी, दि.२३ : “सुषमाताई आगे बढो….! हम तुम्हारे साथ है….!” अशी जोरदार घोषणाबाजी करत
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे आज सावंतवाडीत जंगी स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्यासह येथील शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देण्यात आला.
यावेळी शिवसेना उपनेत्या संजना घाडी, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हा संघटक जानवी सावंत, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, चंद्रकांत कासार, मायकल डिसोजा, बाळा गावडे, आबा सावंत, योगेश नाईक, शब्बीर मणियार, मेघशाम काजरेकर, उल्हास परब, श्रुतिका दळवी, रश्मी माळोदे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.