सावंतवाडी,दि.२९: तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा हा दिव्य संदेश देत जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या वतीने अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. समाजातील रंजल्या गांजलेल्या लोकांना मदत करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य या द्वारे केले जाते. समाजीकतेचे भान राखत समाजाप्रती ऋण व्यक्त करत जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थान सिंधुदुर्ग युवा समिती वतीने जिल्हा युवा प्रमुख महेश तांडेल यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपण उपक्रम सावंतवाडी संस्थानच्या राजवाडा परिसरात राबविण्यात आला. यावेळी स्वामींच्या प्रतिमेला राणीसाहेब शुभदादेवी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी अर्चना परब, सुरेश दळवी, जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या महिला जिल्हाध्यक्ष गौरी खोचरे, जिल्हाध्यक्ष दिनेश मुंबरकर, जिल्हा युवा प्रमुख महेश तांडेल, जिल्हा सचिव परेश करंगुटकर, गोवा पीठ युवा निरीक्षक राजेश गावकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष निलेश बोन्द्रे, कणकवली तालुकाध्यक्ष एकावडे, सर्व तालुका युवा प्रमुख आणि मोठ्या प्रमाणात युवा उपस्थित होते. यावेळी शुभदादेवी यांनी या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. अर्चना घारे यांनी युवा शक्तीचे कौतुक केले. युवा आज अनेक समस्यांना तोंड देत असताना संस्थानच्या वतीने जे उपक्रम राबविले जातात ते कौतुकास्पद आहेत. या साठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही अर्चना घारे यांनी दिली. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी देखील या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाला 70 युवक युवती उपस्थित होत्या..