केसरकर यांच्या जवळच्या नॅबच्या अध्यक्षांना जनआक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा देण्याची नामुष्की…

0
90

सावंतवाडी दि.२४ :शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी रोटरीच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू केले आणि आज ते कॅबिनेट मंत्री आहेत. तसेच रोटरी क्लबचे सदस्य असूनही रोटरीच्या नेत्र रुग्णालयाच्या पार्ट परमिशन साठी लागणारा नाहरकत दाखला देण्यासाठी नगरपरिषद मुख्याधिकारी चालढकल पणा करत असल्याने केसरकर यांच्या जवळच्या नॅबच्या अध्यक्षांना जनआक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा देण्याची नामुष्की ओढवली आहे.

सावंतवाडी येथील रोटरी क्लबच्या नेत्र रुग्णालयाच्या पार्ट परमिशन साठी लागणारा नाहरकत दाखला येत्या दोन दिवसात द्या अन्यथा प्रशासनाच्या विरोधात दि.२८ जुलै रोजी अधबांधव व कर्मचाऱ्यांना घेऊन जनआक्रोश आंदोलन छेडू असा इशारा नॅबचे अध्यक्ष अनंत उचगावकर यांनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना निवेदनिव्दारे दिला आहे.

श्री उचगावकर यांनी यासंदर्भात पालिकेला दिलेले निवेदन प्रसिद्धीस दिले आहे, या निवेदनात असे म्हटले की येथील नॅब नेत्र रुग्णालयाच्या पार्ट परमिशनसाठी आवश्यक असलेल्या नाहरकत दाखल्यासाठी रितसर मागणी केली होती मात्र पालिकेच्या यंत्रणेद्वारे सिस्टममध्ये दोष असल्याचे सांगून ऑफलाईन परमिशन मागितली आहे असे उत्तर देऊन आठ दिवस थांबण्याची विनंती केली. मात्र आठ दिवस उलटूनही ना हरकत दाखला मिळत नसल्याने रुग्णालयासाठी आवश्यक असणाऱ्या पुढच्या परमिशन मिळत नाही पर्यायाने नेत्र रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर सुरू करताना अडथळे येत आहे यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहेत एकूणच परिस्थिती पाहता येत्या २७ तारीख पर्यंत म्हणजे दोन दिवसात पालिका प्रशासनाकडून ना हरकत दाखला देण्यात यावा अन्यथा २८ तारीख रोजी प्रशासनाच्या विरोधात अंध बांधव रुग्णालय कर्मचारी व सामाजिक बांधिलकी माननारे स्थानिक नागरिक यांच्यासह जन आक्रोश आंदोलन छेडावे लागेल असे म्हटले आहे.परवानगी देण्यास पालिका प्रशासनाकडून चालढकलपणा होत असल्याने रुग्णालयाचे
ऑपरेशन थिएटर सुरू करता येत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here