सावंतवाडी एसटी स्टँड येथे कार्यक्रमाचे आयोजन
सावंतवाडी,दि.०८: सद्यस्थितीत चाललेल्या राजकीय चिखलमय परिस्थितीत एक सही संतापाची अभियाना अंतर्गत उद्या सावंतवाडी एसटी स्टँड येथे एक सही संतापाची ह्या सह्यांच्या मोहिमेचा मनसेच्या वतीने आयोजन करण्यात आला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने एक सही संतापाची अभियाना अंतर्गत उद्या रविवार दिनांक ९ जून रोजी सावंतवाडी एसटी स्टँड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या अभियानात जनतेने सहभागी व्हावे व आपला रोष व्यक्त करावा असे आवाहन मनसे तर्फे विधी व जनहित कक्ष जिल्हा संघटक अँड अनिल केसरकर, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर आणि माजी जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ यांनी केले आहे.