येथील आगार परिसरातील समस्यांबाबत केली चर्चा..
सावंतवाडी,दि.०३: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सावंतवाडी एस टी आगाराला भेट देण्यात आली. आणि येथील आगार परिसरातील खड्डे तसेच अनियमित सुरू असलेल्या एसटी फेऱ्या मुलांचे पासेस तसेच मुलांची होत असलेली गैरसोय या सर्व बाबींसंदर्भात उपस्थित अधिकाऱ्यांशी प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. आज मनसेचे पदाधिकारी सावंतवाडी आगारातील खड्ड्यांमध्ये वृक्षरोपण करण्यासाठी सावंतवाडी आगारात दाखल झाले त्यानंतर उपस्थित अधिकारी श्री पवार यांनी सोमवार पर्यंत खड्डे बुजवण्यात येतील असे आश्वासन मनसे पदाधिकाऱ्यांना दिले त्यानंतर सोमवार पर्यंत खड्डे न बुजवल्यास या ठिकाणी मंगळवारी खड्ड्यांमध्ये वृक्षरोपण करत आंदोलन छेडू असा इशारा उपस्थित मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून आगर प्रमुखांना देण्यात आला. तर कंट्रोल रूम मधून अरे रवीची भाषा करण्यात येत आहे चौकशीसाठी गेलेल्या प्रवासी व विद्यार्थ्यांबरोबर होत असल्याचे निदर्शनास आले त्याबाबतही योग्य ती समज द्या अन्यथा आम्ही मनसे स्टाईल समज देऊ असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला यावेळी माजी शहराध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार परिवहन कार्याध्यक्ष संतोष भैरवकर माजी उपशहरअध्यक्ष प्रवीण गवस माजी आरोस विभागअध्यक्ष मंदार नाईक म.न.वि.से उपतालुकाध्यक्ष प्रणित तळकर प्रशांत सावंत योगेश घाडी आदी उपस्थित होते.