सावंतवाडी,दि.२९: आषाढी एकादशीच्या निमित्ताने येथील विठ्ठल मंदिर येथे विठ्ठलाच्या भेटीचा सोहळा अनोखा होता. हा सोहळा घडला शहरातील माठेवाडा येथील जिल्हा परिषद शाळा नंबर दोन मधील अंगणवाडी क्रमांक ६६ च्या तीन वर्षाच्या चिमुकल्यामुळे !
आषाढी एकादशीच्या निमित्ताने या अंगणवाडी मधील चिमुकल्याने विठ्ठल भेटीचा सोहळा साकार केला यानिमित्ताने यांच्या या वारीमध्ये वारकरी बनले अंगणवाडीतीलच चिमुकली बालके, आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या भूमिकेत सुकम करमळकर तो रखुमाईची भूमिका स्निग्धा प्रभू हिने साकारली.
शहरातील जिल्हा परिषद शाळा नंबर दोन मधील अंगणवाडीतील या विठ्ठल दर्शनाच्या वारीत छोटी छोटी बालके वारकरी बनली होती. माठेवाडा येथून चालत या बालकानी संस्थानकालीन श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये ग्यानबा तुकारामचा गजर करत साक्षात विठ्ठल रखुमाई चे दर्शन घेतले त्यामुळे विठ्ठलाच्या भेटीला विठ्ठल आला असा काहीसा नजारा पाहायला मिळाला
यामध्ये अंगणवाडी सेविका अनुराधा पवार, अंगणवाडी मदतनीस अमिषा सासोलकर, यांच्यासह सपना विरोडकर स्वानंदी निवगी, स्वरा प्रभू, नेहा काष्टे, विनिता करमरकर भक्ती नाईक, पूजा मुंज, जयमाला केसरकर हे पालकही सहभागी झाले होते. तर या विठुरायाच्या वारीचे वारकरी रिद्धीमा, गंधार, रोहित, भार्गवी, शिवण्या, शुभ्रा वेदांश, राजवीर, रुद्र, शुभ्रा, तनया,योगिता,विशाखा आदी छोटी छोटी बालके डोकीवर टोपी, पारंपारिक वेषात सहभागी झाली होती.
Home ठळक घडामोडी आषाढी एकादशीनिमित्त सावंतवाडीत अंगणवाडीच्या बालकांची वारी निघाली विठ्ठल रखुमाईच्या भेटीला…