चालू असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे.. ग्रा.स.सुरेंद्र सावंत यांचा आरोप
दोडामार्ग, दि.१५ : तालुक्यात कळणे फाटा ते तळकट या रस्त्याचे चालू असलेले खडीकरण आणि डांबरीकरणाचे काम हे निकृष्ट दर्जाचे आहे असा आरोप करत आज येथील ग्रामस्थांनी काम बंद केले.
दरम्यान तळकट ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र सावंत यांनी रस्त्यावर घातलेली खडी बाजूला केली असता डांबराचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले असल्याचे सावंत यांनी उपस्थीत ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिले आणि चालू असलेले काम बंद केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र सावंत, प्रथमेश सावंत, प्रणव गवस, महेश देसाई, शैलेश गवस, अमित म्हाबळ, प्रकाश सावंत, नाना देसाई आदी ग्रामस्थ उपस्थित होते.