सिंधुदुर्ग गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाची कारवाई..
सावंतवाडी,दि.१० : बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने कृष्णा ऊर्फ राजन गुरव रा.वसोली ता. कुडाळ याला ताब्यात घेतले आहे.
याच गावातील आणखी एकावर शनिवारी कारवाई करण्यात आली होती. त्याच्याकडून अडीच लाखाच्या दारूसह दोन लाखाची गाडी असा एकूण साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दाणोली येथील विश्रामगृहाच्या परिसरात करण्यात आली.संशयित हा कार गाडीतून दारू भरून कोल्हापूरच्या दिशेने जात होता. याबाबतची माहिती अज्ञाताकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला देण्यात आली होती. त्यानुसार ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण चे पोलीस अनुपकुमार खंडे, प्रकाश कदम, प्रमोद काळसेकर, यश आरमारकर आदीच्या पथकाने कारवाई केली आहे.कारवाई नंतर याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.