सावंतवाडी, दि. ०२ : नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान सावंतवाडी संचालित शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल, सावंतवाडी या प्रशालेतील दहावीचा (एसएससी) निकाल १००% लागला
कुमारी प्रांजल पांडुरंग भुसानावर ही ९६. ६०% टक्के गुण मिळवत प्रशालेत प्रथम आली तर कुमार सिद्धेश अरुण गावडे हा ९५.२०% व कुमारी किंजल अविनाश पै ही ९५.२०% गुण मिळवत द्वितीय आणि कुमारी प्रिती रामा गावडे ही ९४.८०% गुण मिळवून प्रशालेत तिसरी आली.
या सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. विकासभाई सावंत, अध्यक्ष डॉ. सुरेंद्र जगन्नाथ चव्हाण, उपाध्यक्ष श्री. अनंत ओटवणेकर, व नारायण देवरकर, सचिव श्री. व्ही. बी. नाईक, सदस्य श्रीमती कुंदा प्र. पै, प्रसाद ग. सावंत, श्री. धीरेंद्र भा. होळीकर, श्री. सुहास चव्हाण, सौ. शर्वरी (मोहिनी) मडगांवकर, सौ. गौरी पाटील, कार्यकारी संचालक श्री. विक्रांत सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बाळासाहेब नंदिहळ्ळी, विशेष कार्यकारी अधिकारी श्री. मनोहर वेंगुर्लेकर, मुख्याध्यापक श्री. समीर परब, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.