सावंतवाडी,दि.०२: तालुक्यातील शिरशिंगे येथील श्रीदेवी पावणाई रवनाथ विद्यामंदिर चा दहावीचा (एसएससी) निकाल १००% लागला.
कुमारी प्रणाली दिपक राऊळ ही ८४% टक्के गुण मिळवत प्रशालेत प्रथम आली, तर कुमारी सुजल सुमंत राऊळ ८२%गुण मिळवत द्वितीय, व कुमार बाबली रमेश चव्हाण ८०.८० टक्के गुण मिळवून प्रशालेत तिसरा आला.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री शंकर राऊळ, श्री तुळशीदास राऊळ सर, घोगळे मॅडम, समुद्रे सर, घावरे मॅडम, सुमन राऊळ, ग्रामस्थ व कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.