निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप करत धाकोरे मार्गे चालू असलेले काम मनसेने रोखले…

0
112

सिंधुदुर्ग, दि.१८: आजगाव वजराट धाकोरे मार्गे चालू असलेल्या रस्त्याचे काम आज मनसेने रोखले त्या ठिकाणी चालू असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे होते आहे ठेकेदार व अधिकारी वर्ग यांचा पूर्णपणे त्या ठिकाणी दुर्लक्ष होता असा आरोप करत मनसेचे माजी शाखा अध्यक्ष निलेश मुळीक यांनी त्या ठिकाणी धाव घेत कामाचे पाहणी केली व काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे त्या ठिकाणी आढळले त्या ठिकाणी घालत असलेले डांबर हे निकृष्ट दर्जाचे होते सदर रस्त्याचे काम मनसेचे निलेश मुळीक यांच्यासह धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक सदस्य प्रवीण पालव जय शेळके आदींनी काम रोखले व दर्जाहीन काम करू देणार नसल्याचे ठेकेदार व अधिकारी वर्गाला इशारा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here