ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विकासकामा संदर्भात देण्यात आले निवेदन
सावंतवाडी,०६ : येथील शिरशिंगे उपसरपंच पांडुरंग राऊळ यांनी काल जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची बांदा येथे भेट घेऊन ग्रामपंचायत कार्यशेत्रातील विकास कामासंदर्भात निवेदन दिले. यामध्ये शिरशिंगे धोंडवाडी येथील पुलाची उंची वाढविणे, शाळेचे छप्पर दुरूस्ती करणे, ग्रामपंचायत विस्तारीकरण, सैनिक भवन, स्मशान भूमी दुरूस्ती अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणपत राणे उपस्थित होते.