सिंधुदूर्ग क्रीकेट असोशिएनने दिलेल्या बॉलवर सचिन तेंडुलकरने दिला “ऑटोग्राफ”
सावंतवाडी,दि.२५: क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी याची सावंतवाडीतील ओम अमोल टेंबकर या चिमुकल्याने भेट घेतली.
यावेळी सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या सिझनच्या बॉलवर त्याने सचिनचा ऑटोग्राफ घेतला यावेळी घाई गडबडीत असताना सुद्धा सचिनने त्या चिमुकल्याची इच्छा पुर्ण केली वेळ दिला व “गुड बाॅय” म्हणून कौतुक केले.
क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर हा गेले दोन दिवस वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे परिसरातील एका आलिशान हॉटेलमध्ये राहत होता वाढदिवसाच्या निमित्ताने तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी आला होता गेले दोन दिवस त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावरील हॉटेलमध्ये राहण्यासोबत समुद्रकिनाऱ्यावर क्रिकेट खेळण्याचा आस्वाद लुटला होता.
आज मोपा विमानतळावरून परतीच्या प्रवासाला निघाला यावेळी त्याचा फॅन असलेल्या सावंतवाडीतील चिमुकल्या ओमने त्याची मोपा विमानतळ परिसरात भेट घेतली.
यावेळी सुरक्षेच्या गराड्यात आणि घाई गडबडीत असताना सुद्धा सचिनने त्याला वेळ दिली यावेळी ओम यांनी सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून देण्यात आलेल्या सीजन बॉलवर सचिनची ऑटोग्राफ घेतला.
हा बॉल जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ चोडणकर,सचिव बाबल्या दुभाषी, खजिनदार राजेंद्र डोंगरे व सदस्य राजन नाईक यांनी त्याला वाढदिवसाच्या निमित्त भेट दिला होता.
सचिन तेंडुलकर आज परतणार हे माहीत असल्याने त्याचा चाहता असलेल्या ओमने मोपा विमानतळ जाऊन त्याची भेट घेतली यावेळी त्याचे वडील अमोल टेंबकर जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे,अनंत जाधव आदी उपस्थित होते.