मंडळाकडून उपजिल्हा रुग्णालयाला रुग्णपयोगी वस्तू भेट..
सावंतवाडी,दि. ०५ : येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
डॉ. दुर्भाट हे गेली २२ वर्षे अविरहीतपणे चांगल्या प्रकारे रुग्ण सेवा बजावत आहेत.त्यांची जिल्ह्यामधे गोर गरिब रुग्णांचे कैवारी म्हणुन ओळख आहे. आपल्या या रुग्ण सेवेत त्यांनी तीस हजार हून अधिक महिलांच्या प्रसुती यशस्वी रीत्या पार पडल्या. अशा या त्यांच्या कार्याचे कौतुक म्हणून या मंडळाच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
दरम्यान रुग्णपयोगिक वस्तू रुग्णालयाला भेट म्हणून त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.
यावेळी अध्यक्ष बंटी माठेकर, उपाध्यक्ष बंड्या तोरसकर, विजय पवार, सचिव दिपक सावंत, सहसचिव महादेव राहु राहुल, संजय साळगावकर, अरुण घाडी, रत्नाकर माळी आदी उपस्थित होते.