सावंतवाडी, दि.१९ : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरशिंगे नंबर एक च्या विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग टॅलेंट परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवत आपल्या शाळेचे व गावाचे नाव सिंधुदुर्ग पातळीवर उज्वल केले आहे.
या परीक्षेत अन्वी अजित देसाई इयत्ता दुसरी हिने १७० गुण मिळवून सुवर्णपदक मिळवत जिल्ह्यात २५ वी तर तालुक्यात सहावी आली. कु. अक्षरा अनिल राऊळ इयत्ता सहावी १५४ गुण मिळवून सिल्वर पदक मिळवले व जिल्ह्यात ४८ वी तर तालुक्यात पंधरावी आली.
या दोन्ही यशस्वी विद्यार्थिनींचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनटक्के मॅडम व शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडुरंग राऊळ, सदस्य व ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री पांडुरंग राऊळ यांनी बोलताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन केल्यास व त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्यास आपल्या गावातील विद्यार्थी जिल्ह्यात नव्हे तर राज्यात व देश पातळीवर आपल्या गावचे नाव रोशन करतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
Home ठळक घडामोडी जि.प.पूर्ण प्रा. शाळा शिरशिंगे नं. (१) एक च्या विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग टॅलेंट परीक्षेत...