नववर्षाचे निगुडे गावामध्ये जल्लोषात स्वागत..

0
249

बांदा,दि.२४ : हिंदू नववर्षाचे म्हणजेच गुढीपाडव्याचे औचित्य साधत निगुडे गावातील महिला, लहान मुले यांनी मराठी गाण्यांच्या तालावर लेझीम नृत्यसह नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले.
सर्वसामान्य लोकांपर्यंत आपल्या हिंदूंच्या सणाची, मराठी नववर्षाचं स्वागत कसं करायचं या उद्देशाने सदर प्रभात फेरी काढण्यात आली. सर्व महिलांनी नववारी साडी परिधान करत भगवे फेटे बांधून मराठी नववर्ष स्वागत केले.
यावेळी प्रभात फेरीमध्ये निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, समीर गावडे, गुरुदास गवंडे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र गावडे, शैलेश म्हाडगुत,माजी ग्रामपंचायत सदस्य ईशा तुळसकर, समीक्षा गावडे, लक्ष्मी दळवी, महिला रोहिणी गावडे, नेहा पोखरे, शुभांगी गावडे आदी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
श्री देव पिंपळेश्वर मंदिर निगुडे- तेलवाडी ते श्री देवी माऊली मंदिर अशी फेरी काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषवाक्य देत फटाक्यांची आतषबाजी करत हिंदू नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी जेष्ठ महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. निगुडे माजी सरपंच शांताराम गावडे यांनी सदर कार्यक्रमास सहकार्य केलं. तसेच लेझीम साहित्य निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर व माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी दिले सदर कार्यक्रमाची सांगता श्री देवी माऊली मंदिर निगुडे या ठिकाणी झाली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here