राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ.अर्चना घारे परब यांचा स्तुत्य उपक्रम..
सावंतवाडी, दि.०८ : येथील श्रीराम वाचन मंदिर येथे जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने
विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करून महिला दिन साजरा करण्यात आला.
महिला आज सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत मात्र त्यांना हवा तसा पुरुषांच्या तुलनेत अजूनही दर्जा दिला जात नाही, ती आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र झटत असते, त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक क्वचितच होत असते, यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खास महिलांचा आदर म्हणून महिला दिनानिमित्त आज उच्चशिक्षित ते घर काम करणाऱ्या महिलांचा शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या सत्कारमूर्तींमध्ये श्रीमती सरिता सिताराम सावंत,श्रीमती प्रांजली प्रमोद सुभेदार,सौ प्रज्ञा मोंडकर, श्रीमती क्रांती सुभाष मिशाळ, श्रीमती सुरेखा राजेंद्र रंकाळे, नूर जहान अब्दुल मुनाफ खतीब, सौ विना दळवी, कु. उषा पूनलेकर, नुसरत राजगुरु, सौ अनिता अनंत रसाळ,श्रीमती वृषाली भोसले, सौ.हसीना कळवी,श्रीमती मयुरी बावकर, श्रीमती स्नेहल गोडसे, ममता सदानंद वाडकर,दीपा आसोलकर, सरिता मामलेकर, वंदना तोडणकर,श्रीमती संजीवनी शिरसाट, सौ सुंदरी पेडणेकर, अनुराधा महाजन, सौ समीक्षा पटेल, सौ.सविता देसाई, श्रीमती क्लारा उर्फ रीहाना खान, सरोज धारगळकर, क्रांती मे, फर्जना तहसीलदार, ममता
केसरकर, प्रांजल राऊळ आदींचा समावेश होता.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांनी आयोजित केलेल्या हा सत्कार समारंभ आमचा घरगुती कार्यक्रम आहे, घारे मॅडम या सर्व सामान्यांमध्ये मिसळणाऱ्या आहेत त्यांनी कमी कालावधीमध्ये या मतदार संघातील लोकांची मने जिंकली आहेत. भविष्यात त्या आमदार होतील अशा शब्दात उपस्थित महिलांनी अर्चना घारे परब यांचे कौतुक केले.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,अफरोज राजगुरू, सायली दुभाशी, दर्शना बाबर देसाई,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला, युवती, बेसिक, युवक तसेच सर्व सेलचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.