सावंतवाडी शहरातली भाजी मंडई बाबत मंत्री दीपक केसरकर यांची एकाधिकारशाही आम्ही चालवून घेणार नाही..

0
151

सर्वांना विश्वासात घेऊनच त्यांनी मंडई बाबत निर्णय घेणे आवश्यक.. माजी नगराध्यक्ष संजू परब

सावंतवाडी, दि.२२ : येथील भाजी मंडई बाबत मंत्री दीपक केसरकर यांची एकाधिकारशाही आम्ही चालवून घेणार नाही सर्वांना विश्वासात घेऊनच त्यांनी मंडई बाबत निर्णय घेणे आवश्यक आहे.त्यामुळे मंत्री केसरकरांनी घेतलेल्या बैठकीबाबत आपण समाधानी नाही व्यापाऱ्यांचे योग्य पुनर्वसन झाल्याशिवाय भूमिपूजन होऊ देणार नाही अशी भूमिका माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मांडली.
ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेक उपस्थित होते.
परब म्हणाले, राज्यात भाजप आणि शिंदे गट एकत्र काम करत असताना सावंतवाडी शहरात मंत्री दीपक केसरकर यांनी विकास कामात आम्हाला विश्वासात घेणे गरजेचे आहे सावंतवाडी नगरपरिषद भाजी मंडई संदर्भात एकाधिकारशाही चालवत आहे आपण नगराध्यक्ष असताना भाजी मंडई चा आराखडा मंजूर झाला होता.त्यामुळे या संदर्भात बैठक घेताना केसरकर यांनी आपल्यासह अन्य शहरातील राजकीय पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणे गरजेचे होते मात्र तसे न करता केसरकर यांनी बैठक घेऊन परस्पर निर्णय घेतले.
त्यामुळे या बैठकी संदर्भात आपण समाधानी नाही.तेथील व्यापाऱ्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे यासाठी आपण आजही आग्रही आहे त्यांचे योग्य पुनर्वसन करूनच भूमिपूजनाचा घाट घालण्यात यावा. आपल्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तसेच सेल्फी पॉइंट ही कामे सुरू होऊनही पूर्णत्वास गेली नाहीत तसेच बॅ.नाथ पै सभागृह नुतनीकरण काम अद्यापही पूर्ण झालेले नाही एकूणच याचा फटका नागरिकांना बसत आहे त्याची आपल्याला खंत असून लवकरच आपण या संदर्भात पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here