पत्रकार संरक्षण समितीची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर

0
149

अध्यक्षपदी श्री. प्रसाद मडगांवकर तर सचिवपदी श्री. शैलेश मयेकर

सिंधुदुर्ग, दि.१८: संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नावलौकिक असलेल्या “पत्रकार संरक्षण समिती (महाराष्ट्र)” ची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली असून, समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. विनोद पत्रे यांनी नियुक्तीपत्र प्रदान करत श्री. प्रसाद भास्कर मडगांवकर यांची जिल्हाध्यक्षपदी, तर सचिवपदी श्री. शैलेश सुदाम मयेकर यांची नियुक्ती केली आहे.
पत्रकार संरक्षण समिती जिल्हा कार्यकारिणी च्या खजिनदारपदी श्री. वासुदेव उर्फ नयनेश गावडे, जिल्हा उपाध्यक्ष . संजय सखाराम पिळणकर,जिल्हा संघटक श्री. जाफर शेख, सहसचिव श्री. यशवंत कृष्णा माधव तर सह खजिनदार पदी श्री. मदन शंकर मुरकर यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या २९ जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या,शहरी व ग्रामीण पत्रकारांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या समस्यांना न्याय देणाऱ्या पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. विनोद पत्रे यांनी दूरध्वनीवरून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत, पत्रकार संरक्षण समिती सिंधुदुर्गच्या सर्व सभासद पदाधिकाऱ्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here