निवडणूक आयोगाचा निर्णय.. उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का..
नवी दिल्ली,दि. १७ : शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या गेले काही सुरू असलेल्या वादाला अखेर पूर्ण पूर्णविराम मिळाला आहे.
शिवसेना आणि धनुष्यबाण हे दोन्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे असल्याचा निर्वाळा केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यामुळे या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात आठ महिन्यांपूर्वी सर्वात मोठा भूकंप झाला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात ४० आमदारांच्यासोबत बंडखोरी केली होती. एकनाथ शिंदे सर्व बंडखोर आमदारांना आपल्यासोबत घेऊन सूरत, त्यानंतर गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून सत्तांतर घडवून आणलं होतं. या घडामोडींनंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला होता. गेल्या आठ महिन्यांपासून याबाबत सुनावणी सुरु होती. निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झालेला होता. त्यानंतर कधीही निकाल येणं अपेक्षित होतं. त्यानुसार आज संध्याकाळी निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आला.
या निकालामुळे ठाकरे गटाला खूप मोठा धक्का मानला जात आहे.