उपसरपंच हेमंत मराठे यांनी मानले आगार व्यवस्थापकांचे आभार..
सावंतवाडी,दि.१७ : मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांच्या मागणीला अखेर यश आले असून बांद्याहून वेंगुर्ला येथे जाणाऱ्या गाडीची वेळ वाढवून देण्यात आली आहे.
मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी मुलांची परवड होत असल्याने एसटी फेरांच्या वेळेत बदल करावी अशा मागणीचे पत्र वेंगुर्ला आगार व्यवस्थापक विशाल शेवाळे यांना दिले होते.यात बांदा येथून दुपारी ०३.१५ वाजता सुटणारी बांदा ते वेंगुर्ला या गाडीची सुटण्याची वेळ अर्धा तास वाढवून देण्यात आल्याने सदरची बस बांदा येथून पावणेचार वाजता सुटणारा आहे.ही बस फेरी ची वेळ बदल्याने विद्यार्थ्यांची होणारी पायपीट आता थांबणार आहे.बस च्या वेळेत बदल केल्याने आगार व्यवस्थापक विशाल शेवाळे व स्थानक प्रमुख निलेश वारंग यांचे मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी आभार मानले आहेत.