मुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार कार्यक्रमाचे उद्घाटन..
वेंगुर्ला,दि.१५ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे १७ वे त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन उद्या बुधवार दि. १६ फेब्रुवारी २०२३ राजी वेंगुर्ला येथे होत असून या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्घाटक म्हणुन उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाला राज्यभरातून अंदाजे एक लाख शिक्षक उपस्थित राहतील, अशी माहिती समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या महा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून सर्व शाळांना उद्या विशेष सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या महाअधिवेशनाचे उद्घाटन उद्यागुरुवारी सकाळी ११.०० वाजता मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे, वैभव नाईक, निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.