कलंबिस्त पंचायत समिती मतदारसंघातून युवा नेतृत्व प्रथमेश सावंत यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल; मतदारसंघाच्या विकासासाठी तरुणाचा निर्धार

0
11

सावंतवाडी,दि.२१: कलंबिस्त पंचायत समिती मतदारसंघातून एक अभ्यासू, तरुण, संयमी आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे प्रथमेश प्रभाकर सावंत यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. राजकीय व सामाजिक वारसा, वैयक्तिक कर्तृत्व आणि विकासाची स्पष्ट दृष्टी यांचा संगम असलेले प्रथमेश सावंत हे नाव सध्या संपूर्ण मतदारसंघात आशेचा किरण म्हणून पुढे येत आहे.

३२ वर्षीय प्रथमेश सावंत हे उच्चशिक्षित असून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षणासोबतच त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रातही अनेक वर्षे सक्रिय योगदान दिले आहे. गावपातळीवर काम करताना त्यांनी प्रशासकीय कामकाजाची सखोल जाण मिळवली असून, राजकारणातील दांडगा अनुभव आणि मतदारसंघाची बारकाईने असलेली ओळख ही त्यांची मोठी जमेची बाजू मानली जात आहे. शांत आणि संयमी स्वभाव, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती आणि तरुणाईला आकर्षित करणारी तडफदार कार्यशैली यामुळे अल्पवधीतच त्यांनी जनमानसात आपली जागा निर्माण केली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपली भूमिका मांडताना प्रथमेश सावंत म्हणाले की, आपला गाव आणि संपूर्ण मतदारसंघ चुकीच्या हातात जाऊ नये, तसेच धनशक्तीमुळे तरुण पिढी अमली पदार्थ व व्यसनाधीनतेकडे वळू नये, यासाठी आपला हा लढा आहे. स्थानिकांनी आपली जमीन परप्रांतीयांना विकू नये, गेल्या दहा वर्षांपासून रखडलेला विकास मार्गी लागावा आणि कलंबिस्त मतदारसंघाचा सर्वांगीण व नियोजनबद्ध विकास व्हावा, या मुख्य उद्देशाने आपण प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उतरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या कलंबिस्त, शिरशिंगे, वेर्ले, सावरवाड, ओवळीये आणि कलंबिस्त दशक्रोशी आदी गावांमधून प्रथमेश सावंत यांना जनसामान्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षातील इच्छुक उमेदवारही “प्रथमेश तू निवडणूक रिंगणात असशील तर आम्ही मदत करू” असे जाहीरपणे सांगत असल्याने त्यांची स्वीकारार्हता अधिक ठळक झाली आहे. कलंबिस्त पंचायत समिती मतदारसंघात कलंबिस्त गाव हा मतदार संख्येने मोठा असल्याने हा गाव निवडणुकीत नेहमीच निर्णायक ठरतो, असा इतिहास आहे. याच गावातील तरुण उमेदवार रिंगणात असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here