..अन्यथा सर्व ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल;ॲड.दिपक काणेकर
कुडाळ,दि.१४: माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये सुमारे ३० ते ३५ गावे येत असून सदर गाव हे अतिशय दुर्गम व डोंगरी भागांमध्ये येतात.डोंगरी भाग असल्याकारणाने वारंवार सरपटणारी जनावरांपासून विषबाधा होण्याचे प्रकार घडत आहे. आतापर्यंत सदर विषबाधामुळे दोन रुग्ण दगावले आहेत. आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामधून योग्य ते उपचार होत नसल्याने सदर अनेक रुग्णांना तसेच गरोदर महिलांना सुद्धा अनेक वेळा सावंतवाडी येथे पाठविण्यात येते.आरोग्याच्या विविध समस्या बाबत माणगाव ग्रामस्थासहीत ॲड.दिपक काणेकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती डॉ.सई धुरी यांच्यासमोर समस्येवर प्रश्न उपस्थित केले.
यावेळी माजी उपसरपंच सचिन परब, माजी सभापती मोहन सावंत, बाळा कोरेगावकर, प्रसाद नार्वेकर, अमित परब, हरी परब,बाळू केरकर,भिकाजी केरकर, सौं. रंजिता राजन तानावडे, सौ. मंगल शिरसाठ, गणेश शिरसाठ,भाऊ पावसकर, दिपक वारंग, बाळा धुरी,संकेत काणेकर,अमित सुपल आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
आरोग्य केद्रामध्ये ओपीडी वेळ निश्चित केलेला नाही.बाहेर तशा प्रकारची माहिती बोर्ड लावलेला नाही. तसेच कार्यलयीन वेळ पाळली जात नाही. त्यामुळे वारंवार रुग्णांना त्रास होत आहे.लहान अंगणवाडीतील मुलांना जंताच्या गोळ्या विटॉमिन एच्या डोस गोळ्या मिळत नाही. माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र माणगाव मध्ये बी.पी. शुगर फॉलिक अॅसिड खोकल्याचे औषधे टी.टीचे इंजेक्शन मिळत नाही. बुधवारी ओपीडीमध्ये महिला गरोदर मातांची तपासणी असते. तसेच इतर रुग्णांची तपासणी असते त्यावेळी आरोग्य क्रेद्रामध्ये दोन डॉक्टर असून दोन्ही डॉक्टर एकाच रुग्णांना तपासणी करतात त्यामुळे दुरून आलेल्या रुग्णांना उपाशीपोटी राहावे लागते.सध्या कार्यरत असलेले डॉक्टर युनिफॉर्म मध्ये आढळत नाही. तसेच त्यांचे आयकार्ड त्यांच्याजवळ नसते.आय कार्ड वापर करत नाही. अनेक गरोदर मातांना उपचारासाठी सावंतवाडी येथे जावे लागत आहे. या सर्व गोष्टीचा विचार केला असता माणगाव खोऱ्यातील दुर्गम भाग असल्याकारणाने या ठिकाणी कायमस्वरूपी MBBS पदवी प्राप्त असलेले डॉक्टरांची फार गरज असून त्यांची कायमस्वरूपी नेमणूक करण्याची यावी तसेच माणगाव उपकेंद्र मध्येCHO हे पद रिक्त आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना गैरसोई मुळे प्रचंड त्रासांना सामोरे जावे लागत आहे.
माणगाव मध्ये पोस्टमार्टम करण्याकरता कटर या पदाची आवश्यकता आहे. तरी या सर्व गोष्टींचा गांभीर्यपूर्वक विचार करून सोई सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा सर्व ग्रामस्थांच्या वतीने येत्या काळात आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस ॲड.दीपक काणेकर यानी निवेदणाद्वारे देण्यात आला.



