या अपघातात दोन्हीं गाड्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान..
सावंतवाडी, दि.०८ : दुचाकी आणि कार यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मुंबई येथील कुणाल फौजदार हा युवक जखमी झाला असून अपघात बुधवारी सायंकाळच्या सुमारास माडखोल येथे घडला.
तर या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी नाही.
दरम्यान घटनास्थळी पोलीसांनी धाव घेत दोन्हीं वाहने बाजूला काढत पंचनामा केला अपघातानंतर वाहने रस्त्यावरच बराच वेळ होती. त्यामुळे सावंतवाडी-आंबोली मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.मात्र नंतर गाड्या बाजूला करण्यात आल्या.
दुचाकीस्वार युवक मुंबई येथून आला होतो. तो शिरोडा वेंगुर्ले च्या दिशेने जात होता. तर कार धारक गोवा येथून कोल्हापूरला जात होता.दरम्यान या दोन्ही वाहनांची माडखोल येथे समोरासमोर जोरदार धडक झाली.
यात दुचाकी चालक कुणाल हा जखमी झाला आहे. तर दोन्ही गाड्यांचे अपघातात मोठे नुकसान झाले. अपघातानंतर दोन्ही गाड्या रस्त्यावर राहिल्याने त्याचा वाहतुकीला अडथळा निर्माण होता.पण नंतर पोलीस मनोज राऊत व डुमिंग डिसोजा हे घटनास्थळावर दाखल होत गाड्या बाजूला केल्या.व रितसर पंचनामा केला.