कलंबिस्तच्या राजकारणात मोठा भूकंप, सरपंच सौ. सपना सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश; ठाकरे गटाला धक्का

0
46

भाजपा युवा नेते विशाल परब व जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, जि. बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश

सावंतवाडी,दि.१९: तालुक्यातील कलंबिस्त ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सपना सावंत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच भाजप युवा नेते विशाल परब आणि जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या प्रयत्नांनी हा पक्षप्रवेश संपन्न झाला.

या पक्षप्रवेश कार्यक्रमात सरपंच सौ. सपना सावंत यांच्यासोबत उपसरपंच सुरेश पास्ते, ग्रामपंचायत सदस्या सौ. रिया राजेश सावंत, सौ. मेधा तावडे आणि अनेक शिवसेना (उबाठा) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग आणि जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत या सर्वांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, देशात आणि राज्यात भाजपच्या विकासात्मक राजकारणामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे प्रभावित होऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

या कार्यक्रमाला भाजपा युवा नेते विशाल परब, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर,जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ, आंबोली मंडळ उपाध्यक्ष किरण सावंत, युवा मोर्चाचे निलेश पास्ते, स्वप्नील राऊळ प्रथमेश सावंत, सुरेश शिर्के, अशोक राऊळ,प्रल्हाद तावडे, संतोष पालेकर, बाळू शिरसाट, राजन राऊळ, भाऊ कोळमेकर, रविकमल सावंत, शिरशिंगे सरपंच दीपक राऊळ, नारायण राऊळ, प्रशांत देसाई, गणपत राऊळ, न्हानू राऊळ,पुंडलिक कदम, सुभाष राऊळ, सोशल मिडिया प्रमुख केतन आजगावकर, आदी कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
या पक्षप्रवेशामुळे कलंबिस्त परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here