राष्ट्रीय संत रोहिदास यांचे साहित्य नव्या पिढीसाठी मराठीतून उपलब्ध व्हावे ; तानाजी वाडकर
सावंतवाडी, दि.०५: राष्ट्रीय संत रोहिदास यांनी मोगलांच्या काळात हिंदू धर्म वाचवण्याचे काम दलित समाजाला उभारी देण्याचे काम केले, उत्तर प्रदेश पंजाब भागात संत रोहिदास यांची देवालये आहेत किमान आपल्या संताचे साहित्य नव्या पिढीला समजावे समाजाच्या संताचे साहित्य हे मराठीतून उपलब्ध व्हावे संत. रोहिदास यांचे कायमस्मरण व्हावे यासाठी पतसंस्था सुरू केली असल्याचे प्रतिपादन संत रोहिदास सह.पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजी वाडकर यांनी केले.
त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संत रोहिदास यांच्या जयंतीचा शुभारंभ झाला यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक आणि पतसंस्थेचे संचालक विलास जाधव, उपाध्यक्ष ,बाबुराव चव्हाण, संचालक मंगेश कदम,गुंडू चव्हाण,माजी नगरसेविका सौ माधुरी वाडकर, मधुरिका चव्हाण श्री सांगेलकर,शेखर दाभोलकर संस्थेचे सचिव सदानंद चव्हाण विनायक चव्हाण दशरथ वाडकर आदी उपस्थित होते.
वाडकर पुढे म्हणाले औरंगाबाद येथे दलित समाज बांधवांनी एकत्र येऊन दवाखाने सुरू करून दलित समाजाची मोफत उपचार व सर्जरी केल्या जातात. आपल्या समाजात अनेक दानशूर आहेत त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन असे उपक्रम सुरू व्हायला हवे. भविष्यात खाजगीकरण होत आहेत त्यामुळे आरक्षण संपूष्टात येईल शिक्षण आहे पण नोकरी नाही अशा प्रकारे समाज चालला आहे. मोफत धान्य दिले म्हणजे सर्व काही होईल असे नाही. तरी समाज बांधवांनी अंतर्मुख व्हायला हवे असे आवाहन त्यांनी केले सुरुवातीला प्रास्ताविक सचिव सदानंद चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक मंगेश कदम यांनी केले.