ऍडमिशन संस्थेच्या नावाखाली सावंतवाडीकरांची दोन वेळा फसवणूक..

0
126

या मागचा मुख्य सूत्रधार कोण..? लवकराच छडा लावणार… माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

सावंतवाडी,दि.०३: एका उद्योजकांनी सावंतवाडीत सुरू केलेल्या ऍडमिशन संस्थेच्या नावाखाली दोन वेळा येथील युवकांची व तालुकावासियांची घोर फसवणूक केली आहे.असा घणाघाती आरोप सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

तर मुंबई विद्यापीठाच्या नावाखाली येथे सुरू असलेले बाळासाहेब ठाकरे प्रबोधनी सेंटर केव्हाच या ठिकाणावरून दुसरीकडे हलवण्यात आले मात्र याची भनक सुद्धा येथील जनतेला नाही, रोजगार मेळाव्याच्या नावाखाली केवळ दहा हजार रुपयांच्या नोकऱ्या २० जणांना देऊन त्यांनी आपली पाठ ठोकून घेतली परंतु आतापर्यंत दाखवलेले सेटअप बॉक्स, मोफत वायफाय आधी आम्ही त्यांचे काय झाले असा सवालाही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष सुरेश भोगटे, विलास जाधव उमा वारंग उपस्थित होते.

सागावकर म्हणाले एक मराठीत तरुण उद्योजक म्हणून यांच्या बद्दल आपल्याला अभिमान आहे परंतु त्यांनी गेले कित्येक वर्षे सावंतवाडीत बस्तान ठोकून सावंतवाडीकरांची तसेच तालुका वासियांची भर फसवणूक केली आहे.

हा सर्व प्रकार कोणाच्या वरदहस्तामुळे चालू आहे याचा लवकरात लवकर आम्ही छडा लावणार असे यावेळी माजी नगराध्यक्ष साळगावकर म्हणाले.

त्यांना या ठिकाणी कोण खेळतो हे त्यांनी जाहीर करावे अन्यथा आपण या शोधासाठी डिटेक्टिव्ह नेमणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here