संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये AI-आधारित स्मार्ट क्लासरूमचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न.
सावंतवाडी,दि.२२ : तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणाच्या नव्या युगाची सुरुवात प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात झाली आहे. येथील संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या प्रांगणात AI-आधारित स्मार्ट क्लासरूमचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला.
शिक्षणाचे अद्वितीय संगम साधत संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर्गाच्या (AI Class) उदघाटन सोहळा संपन्न झाला. हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण अनुभव प्रदान करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या स्मार्ट क्लासरूममध्ये AI वर चालणारे शिक्षण ॲप्लिकेशन्स आणि डिजिटल संसाधने यांचा समावेश असेल. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक आकर्षक, वैयक्तिक गुणवत्तेला चालना आणि प्रभावी पद्धतीने शिकता येणार आहे. AI तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे अधिक चांगल्या प्रकारे विश्लेषण करता येईल, त्यांच्या गरजा ओळखता येतील आणि त्यानुसार शिक्षणात बदल करता येतील. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्या शुभहस्ते हा सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला. यावेळी दर्शन एज्यूकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. शेखर जैन, स्पीड लॅबचे सेल प्रमुख प्रा. सागर ढवळे, सिंधुदुर्ग व गोवा एरिया मॅनेजर रेमी फर्नांडीस, व्हॉईस ऑफ मीडियाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा प्रेरणादायी व्याख्याते प्रा. रुपेश पाटील, निरवडे सरपंच सुहानी गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, संस्कार नॅशनल स्कूलच्या प्राचार्य प्रणाली रेडकर, शिक्षक, पालक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्याचे आगामी काळात भवितव्य उज्वल व्हावे हीच आपली इच्छा! दर्शन एज्यूकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. शेखर जैन
मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता यावा आणि भावी काळात आपली बुद्धिमत्ता वाढविण्यासाठी मदत व्हावी यादृष्टीने आपण या विद्यालयात नवनवीन तंत्रज्ञान व उपक्रम राबवीत असतो लहान मुलाचा शिक्षणाचा पाया लहान वयात भक्कम होणे गरजेचे असते. कारण अचानक दहावी नंतर या मुलाना आधुनिक तंत्रज्ञान अवगत करणे कठीण असते माञ लहान वयात याची महिती करुन दिल्यास त्याची बुद्धिमत्ता वाढते. आपण मुलाचा सर्वागीण विकास कसा होईल व आपले नावं विवध क्षेत्रात मोठे कसे याकडे आपले मुख्य लक्ष आहे असे मत दर्शन एज्यूकेशन संस्थेचे अध्यक्ष शेखर जैन यांनी व्यक्त केले.
शिक्षणाचे अद्वितीय संगम! :
माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी
शिक्षणाचे अद्वितीय संगम साधत संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर्गाच्या (AI class) उदघाटन संपन्न झाला. हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण अनुभव प्रदान करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. असा विश्र्वास, कविता शिपी यांनी व्यक्त केला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते त्यानी आपली मते मांडली. त्याचं प्रमाणे पालक विद्यार्थि यांनी आपले मनोगत व्यकत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे सहाय्यक शिक्षक मनिष सावंत यांनी केले. कार्यक्रमाबद्दल थोडक्यात माहिती प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्रणाली रेडकर यांनी दिली व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका प्रियांका शिरसाट यांनी केले.
हा पूर्ण कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्या प्रणाली रेडकर, सहाय्यक शिक्षक मनीष सावंत, रुपेश सावंत, प्रियांका शिरसाट, पांडुरंग मिशाळ, ममता वैद्य, ऋषी देसाई, धनश्री तुळसकर, अश्विनी सावंत, श्री. नारायण सर, हर्षदा खवणेकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी धनश्री सोनुर्लेकर, कृतिका सुभेदार यांनी प्रयत्न केले.